Ad will apear here
Next
मानसशास्त्रावर डॉ. अश्विनी पाटील यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
डॉ. अश्विनी पाटील लिखित ‘दैनंदिन मानसशास्त्र’ आणि ‘रिझिलियन्स ऑफ अडोलसन्स’ या पुस्तकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. भारती पाटील, प्रा. अमोल कांबळे आदी.

कोल्हापूर :
‘भौतिकवादी युगात माणसांचा एकमेकांशी संवाद कमी होत चालला असून, परिणामी नैराश्य आणि विकृतीत वाढ होत आहे. अशा काळात मानसशास्त्रविषयक लेखनाला जगभरात मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. अश्विनी पाटील यांची पुस्तके भविष्याचा मानसशास्त्रीय वेध घेण्यास दिशादर्शक ठरतील,’ असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या डॉ. अश्विनी पाटील यांनी लिहिलेल्या ‘दैनंदिन मानसशास्त्र’ आणि ‘रिझिलियन्स ऑफ अडोलसन्स’ या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘मानसशास्त्र विभागाच्या वतीने समूह संवादाचे उत्कृष्ट मॉडेल तयार करावे आणि ते विद्यापीठाला सादर करावे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनातही नात्यातील विश्वास हा कृतीतून सिद्ध करून दाखवावा. सदैव सकारात्मक राहावे. आई-वडिलांशी संवाद स्थापित करावा आणि वास्तववादी जीवनाची अभ्यासक्रमाशी सांगड घालून आयुष्य आनंदमय बनवावे.’

या वेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागात विभिन्न विषयांवरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अश्विनी पाटील यांनी आभार मानले. या वेळी प्रा. अमोल कांबळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZVGCF
Similar Posts
डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळे तळागाळातील विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी काढले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन योजना आणि डॉ. अप्पासाहेब
मोडी लिपी शिकायचीय? कोल्हापुरात मोफत प्रशिक्षण कार्यशाळा कोल्हापूर : मोडी लिपी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ३० डिसेंबर २०१९ ते पाच जानेवारी २०२० या कालावधीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मोडी लिपीचे मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
मिशिगन विद्यापीठातील डॉ. स्टुअर्ट गॉर्डन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात रिसर्च प्रोफेसर म्हणून रुजू कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये नव्याने सुरू झालेल्या रिसर्च प्रोफेसर योजनेअंतर्गत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक स्टुअर्ट गॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच ते रुजू झाले असून, मे २०२०पर्यंत ते कार्यरत राहतील.
गांधी ग्लोबल सौर यात्रा : कोल्हापुरात २५० जणांना सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण कोल्हापूर : ‘स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या संदर्भात स्वयंपूर्णता हा जगातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी युवकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून गांधी जयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाप्रति अहिंसा व प्रेम प्रदर्शित करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दोन ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language